शोध पत्रकारितेचे नवे रूप
सत्ताधा-यांनी केलेल्या गैरकारभार चव्हाट्यावर आणून जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम शोध पत्रकार करीत असतात. परंतु, शोध पत्रकारिता करण्यासाठी पत्रकाराला भरपूर वेळ द्यावा लागतो. त्यासाठी वृत्तपत्राचा खर्चही जास्त होतो. त्यामुळे चटपटीत आणि मनोरंजन करणा-या बातम्यांना वृत्तपत्रात अधिक स्थान दिले जात आहे. असे असले तरी इंटरनेटच्या माध्यमातून शोध पत्रकारिता नव्या रूपाने वाचकांसमोर येवू लागली आहे. विकिलिक्सने अफगाण युद्धाबाबतची माहिती जाहीर करून या शोध पत्रकारितेच्या नव्या रूपाकडे लक्ष वेधून घेतले आहे.
लोकसत्ताचे वृत्तसंपादक श्री. प्रशांत दीक्षित यांनी लिहिलेल्या `फ्री मीडिया'चा नवा अवतार या लेखात हा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
0 comments:
Post a Comment